शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

Swarajyatimesnews

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.

दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी घालणे, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, तसेच कोणतीही शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करणे या गोष्टींचा समावेश होता.

२८ मार्च २०२५ ला शिंदोडी येथे झालेल्या बेकायदा माती उपशाप्रकरणी ॲड. विनायक लक्ष्मण फडके यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अजित ओव्हाळ, नंदू ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, राजेंद्र उमाजी माने व कृष्णाबाई अण्णा माने (सर्व रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदोडीचे सरपंच अरूण खेडकर, जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार, शिंदोडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते दौलतराव खेडकर, बहुजन समाज पक्षाचे तालुका संघटक गौतम गायकवाड यांच्यासह मीराबाई ओव्हाळ, एकनाथ सरके, बाजीराव माने, बिरू चोरमले, उत्तम गायकवाड, अण्णा माने, उमाजी माने, राजेंद्र खेडकर, गंगाराम माने, मुक्ताजी सरके गंगाराम माने यांनी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ॲड .फडके यांच्या जमीनीतून कुठलीही मातीचोरी प्रकरणी त्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!