शिरुर तालुक्यातील गुनाट गावात सोमवारी (दि. २५) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने घुसून दरोडा टाकल्याची गंभीर घटना घडली आहे. या दरम्यान त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केली आणि कानातील सोन्याचे झुबे हिसकावण्यासाठी तिचे कान धारदार हत्याराने कापले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (A serious incident took place in Gunat village of Shirur taluka on Monday (25th) midnight when four unidentified thieves forcibly entered a house and robbed it. During this, they brutally beat up a woman and cut off her ear with a sharp weapon to snatch her gold earrings. This incident has created a stir in the area and the police have started an investigation. (ShirurCrime News))
याबाबत सोपान करपे (वय ४८) रा. गुनाट (करपेवस्ती) ता.शिरुर, जि पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन चार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shirur Police Station)
गुनाट गावातील करपे वस्तीमध्ये सोपान करपे हे आपल्या कुटुंबासह राहतात. सोपान करपे हे आळंदी पायीवारीसाठी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत घरातील त्यांच्या पत्नी सुमन करपे या खोलीत एकट्या झोपल्या होत्या. घरातील इतर सदस्य शेजारच्या खोलीत झोपले होते. (Crime in Shirur)
मध्यरात्री सुमारे १:३० च्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेले चार अज्ञात चोरटे घरात घुसले. त्यांनी सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरुण अचानक काढले, ज्यामुळे त्या घाबरल्या आणि ओरडू लागल्या. आवाज ऐकून चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर गळ्याला चाकू लावून गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले.(Pune Gramin Police)
कानातील झुबे काढता न आल्याने चोरट्यांनी धारदार हत्याराचा वापर करून सुमन करपे यांचे दोन्ही कान कापले. चोरट्यांनी घरातील पेटीतील ३ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरी केली. या प्रकारामुळे सुमन करपे गंभीर जखमी झाल्या. (Pune police)
सुमन यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेल्या मुलांनी मदतीसाठी प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली होती. त्यावेळी मुलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. सुमन करपे या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी ती कडी काढली आणि मुले व सुना बाहेर आल्या. त्यांनंतर त्यांचा मुलगा राजेंद्र व आत्माराम त्यांना औषधोपचारासाठी दवाखाण्यात घेवुन गेले.(Pune Crime News)
या घटनेत सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र, कानातील झुबे, वेल आणि ३ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. घटनेची माहिती मिळताच शिरुर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. (Maharashtra police)
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक गिरी हे करत आहेत. (Pune Gramin Police)