शिक्रापूर : दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ शिक्रापूर यांच्या वतीने भैरवनाथ मंदिर येथे हाडांचा ठिसूळपणा व डोळ्यांच्या मोतीबिंदू तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे आयोजन धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रा. लि. बारामती व एच.व्ही. देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल, मोहम्मद वाडी, हडपसर यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व ग्रामनगरीचे सरपंच रमेश गडदे यांनी केले.शिबिराला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. दिनकर कळमकर, खजिनदार अर्जुन शिर्के, सचिव अशोक कुदळे, भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र मांढरे, उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड यांच्यासह संघाचे पदाधिकारी बाळासाहेब शेंडे, वसंत तांबे, निवृत्ती जकाते, प्रभाकर मुसळे आदी मान्यवर उपस्थित होते
या आरोग्य शिबिराचा सुमारे 250 हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी मचे सर यांनी केले तर शेवटी बाबुराव साकोरे यांनी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.