“छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभू भक्तांना पृथ्वी ग्राफिक्सकडून ताक व पाण्याचे वाटप” 

Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) ​स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त, वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळी महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभू भक्तांसाठी कोरेगाव भीमा येथील पृथ्वी ग्राफिक्स डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगतर्फे तसेच संजय सुभाषचंद्र शिवले आणि कौस्तुभ दशरथ होळकर यांच्या वतीने हजार पाण्याच्या बाटल्या आणि ताकाचे वाटप करण्यात आले. भर दुपारच्या उन्हात थंड पाणी आणि ताक मिळाल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले आणि आयोजकांचे आभार मानले.​

या कार्यक्रमाचे आयोजन संजय सुभाषचंद्र शिवले, कौस्तुभ दशरथ होळकर, उमेश थोरात, राम कोतकर, दीपक सालके, चेतन चव्हाण, रोहन चव्हाण, अमोघ शिवले आणि अवधूत गोगावले यांनी केले होते. तसेच गणेश फडतरे, अक्षय फडतरे, राहुल फडतरे, स्वप्नील फडतरे, शुभम फडतरे आणि केदार फडतरे यांनी विशेष सहकार्य केले.​

याप्रसंगी बबन गलांडे पाटील, राजेश नेळघे, हेमंत बत्ते, कैलास सोनवणे, दिलीप देवकर, संजय भापकर, राजेश वाकचौरे, दत्तात्रय ढेरंगे, विजय गव्हाणे, अशोक काशीद, शांताराम कटके आणि मच्छिंद्र हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.​

कौस्तुभ होळकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान भारतभूमीसाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या शंभू भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणे हे धर्माचे काम आहे, आणि ही सेवा भविष्यातही सुरू राहील.

या कार्यक्रमाचे आयोजन संजय सुभाषचंद्र शिवले,कौस्तुभ दशरथ होळकर, उमेश थोरात,राम कोतकर,दीपक सालके,चेतन चव्हाण,रोहन चव्हाण अमोघ शिवले,अवधूत गोगावले यांनीनकेले होते तर  गणेश फडतरे, अक्षय फडतरे, राहुल फडतरे, स्वप्नील फडतरे, शुभम फडतरे, केदार फडतरे यांनी विशेष सहकार्य केले

दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवेमुळे अनेकांचा पहिली पसंती पृथ्वी डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंग – कोरेगाव भीमा येथील कौस्तुभ होळकर यांच्या पृथ्वी डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण सेवेमुळे अनेक पुढारी आणि सर्वसामान्य लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइनमुळे ग्राहकांची पहिली पसंतीचे विश्वसनीय ठिकाण म्हणून ते ओळखले जातात. शंभू भक्तांसाठी केलेल्या सेवेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!