सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी उपस्थित राहण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन
पुणे – जयस्तंभ अभिवादन २०२६ निमित्त देशभरातून अंदाजे १० ते १५ लाख अनुयायी १ जानेवारी रोजी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सुविधा , सुरक्षा पूर्वतयारी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठकीचे शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलिस स्टेशन, शास्त्रीनगर चौक येथे होणार आहे असून या बैठकीस सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.

जयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पुणे–अहमदनगर रोडवरील पेरणे फाटा परिसरात अनुयायांची मोठी गर्दी होणार असल्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस प्रादेशिक विभागाचे सोमेयbमुंडे, वाहतूक विभागाचे हिमांशू जाधव, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विविध विभागांचे पोलीस निरीक्षक, अधिकाऱ्यांसह संबंधित संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्तेही बैठकीत सहभागी होणार आहे.
अभिवादन सोहळ्यातील सुरक्षेची आखणी, वाहतूक व्यवस्थापन, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांची उपलब्धता, स्वयंसेवकांचे समन्वय, मार्गदर्शन केंद्रे आणि पार्किंग सुविधा यासंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस दलाची वाढीव नियुक्ती, तात्पुरते पार्किंग झोन, तसेच वाहतूक योजना आखण्यावर भर देण्यात आला.
