शिक्रापूर येथे शारदा लॉजवर पोलिसांचा छापा,पाच महिलांची सुटका, देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश

Swarajyatimesnews

सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी फेसबुक्र लाइव्ह करत शिक्रापूरच्या वैश्या व्यवसायाची पोलखोल, मॅनेजरला अटक

 शिक्रापूर पोलिसांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) रात्री उशिरा येथील शारदा लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लॉजचा मॅनेजर संतोष सिना पुजारी (वय ३७) याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली आहे.सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी फेसबुक्र लाइव्ह करत शिक्रापूरच्या वैश्या व्यवसायाची पोलखोल केली आहे.

पोलिसांना डायल ११२ वर रात्री ९:४९ वाजता एक निनावी फोन आला. या फोनवर ‘शारदा लॉजमध्ये काही महिलांना जबरदस्तीने देह व्यापार करण्यास भाग पाडले जात आहे, तातडीने पोलीस मदतीची गरज आहे’ अशी माहिती देण्यात आली. या माहितीची गंभीर दखल घेत, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले.

वरिष्ठांकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर, पोलिसांनी एक चलाख योजना आखली. पोलीस हवालदार पोहवा/२०४५ पारखे यांना बनावट ग्राहक म्हणून लॉजमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याकडे एक हजार रुपये देऊन सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले.रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाने शारदा लॉजजवळ गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली. बनावट ग्राहक म्हणून आत गेलेल्या पोहवा पारखे यांनी देह व्यापार सुरू असल्याची खात्री झाल्यावर तातडीने पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर पथकाने लॉजमध्ये छापा टाकला.

छाप्यादरम्यान लॉजच्या काउंटरवर मॅनेजर संतोष पुजारी उपस्थित होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून बनावट ग्राहकाने दिलेले १००० रुपये आणि काउंटरमध्ये ठेवलेली कंडोमची १० पाकिटे जप्त केली. संतोष पुजारी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यापार करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले.या कारवाईत पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली. या महिलांनी पंचांसमक्ष दिलेल्या जबानीत संतोष पुजारीच त्यांना या दलदलीत ढकलत असल्याचे सांगितले.

 शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत वैश्या व्यवसायावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागृतीमुळे कारवाई झाली असून सामाजिक कार्यकर्त्या अन्याय प्रतिकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांच्या जागरूकतेने तसेच फेसबुक लाइव्ह यामुळे या प्रकरणास चांगली प्रसिद्धी मिळाली असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख करत आहेत.

पुणे नगर हायवे,शिक्रापूर चाकण हायवे, सोलापूर हायवे येथे जे काही चुकीचे वैश्या व्यवसाय, मटका धंदे असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून फेसबुक लाइव्ह करत संबंधितांचा चेहराच समाजासमोर आणणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्षा स्वाती गायकवाड व अर्चना केदार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!