रस्त्यात दुचाकी आडवी लावलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून युवकावर चाकूने नऊ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील मोहननगर येथे घडली.
याप्रकरणी तबवायजुल हक्क अन्सारी (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तबरेज आणि त्यांचे मावसभाऊ शाहनवाज हे दुचाकीवरून त्यांच्या वर्कशॉपवर जात होते. दरम्यान, मोहननगर येथील शंकर मंदिराजवळ आल्यानंतर विरुद्ध दिशेने आलेल्या आरोपीची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीला आडवी आली. त्यामुळे शाहनवाज यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी शाहनवाज यांच्यावर चाकूहल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.