शिरूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगार व पूरक व्यवसायाबाबत सणसवाडी येथे युवकांचे रोजगार एल्गार आंदोलन

Swarajyatimesnews

 लवकरच स्थानिकांच्या रोजगाराची दिशा जाहीर करणार – संजय पाचंगे

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर)   येथे मोठ्या संख्येने औद्योगिक क्षेत्र विकसित झाले असून, चार आंतरराष्ट्रीय आणि इतर जवळपास दोनशे छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीची ना हरकत घेताना ३० टक्के रोजगार व पूरक व्यवसाय हिस्सा हा स्थानिकांनाच देवू अशी लेखी ग्वाही दिली गेली आहे. प्रत्यक्षात मात्र यातील एकही कंपनी स्थानिकांना दाद देत नसून काही मोजक्या ठेकेदारांना आणि काही राजकीय वरदहस्त असलेल्या बाहेरच्या ठेकेदारांना जवळ करते व स्थानिकांवर अन्याय करते. याच पार्श्वभूमिवर गेल्या काही दिवसांपासून गावातील काही युवक एकत्र येत असून यावर आवाज उठविण्याबाबत बैठका घेत आहेत.(Sanaswadi   A large number of industrial areas have been developed here, with four international and about two hundred other small and large companies operating. All these companies, despite the objection of the local Gram Panchayat, have given a written assurance that 30 percent of the employment and supplementary business share will be given to the locals. In reality, however, none of these companies appreciate the locals, but rather favor a few contractors and some politically powerful outside contractors and do injustice to the locals. Against this backdrop, some youth of the village have been coming together for the past few days and are holding meetings to raise their voices on this.

यातीलच एक बैठक नुकतीच सणसवाडी गावात झाली असून यासाठी या युवकांनी करावयाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी व मार्गदर्शन मिळविण्यासाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांना निमंत्रित करून चर्चा केली. यात लवकरच सर्व कंपन्यांना पत्रव्यवहार करून शासनाच्या उद्योग खाते तथा कामगार खात्याशीही पत्रव्यवहार करून आंदोलनाची दिशा लवकरच स्पष्ट करण्याचे ठरले.

सणसवाडी येथे दोनशे ते सव्वा दोनशे कंपन्या सुरू आहेत. मात्र येथे या कंपन्यांच्या मदतीला, नियमनाला वा काही अडीअडचणींसाठी ना एमआयडीसी ना अन्य कुठली शासन यंत्रणा. पर्यायाने स्थानिकांच्या रोजगारासाठी नेमकी कुणाकडे दाद मागावी हाच प्रश्न स्थानिक युवकांनी उपस्थित केला. याबाबत न्यायिक पद्धतीने याबाबत शासनाकडे रीतसर दाद मागणार असल्याचे माजी उपसरपंच सागर दरेकर यांनी सांगितल

लेखी ग्वाही देऊनही स्थानिकांना रोजगार-व्यवसाय दिले जात नाहीत. सणसवाडीतील तरुणांची नोंदणी सुरू केली असून, संख्या निश्चित करून आंदोलन करणार आहोत. जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा रोजगार नोंदणी कार्यालयांना सोबत घेऊनच आंदोलन प्रारंभ होईल. – संजय पाचंगे, अध्यक्ष, क्रांतिवीर प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!