वाघोलीत प्रीमियर करिअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा दिमाखदार शुभारंभ! पुणे: आता पुणे शहराच्या पूर्व भागातील वाघोलीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. IVTCE (OPC) Pvt. या नवनिर्मित संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता बकोरी रोडवरील बीजेएस कॉलेजसमोर, ललवाणी कॅपिटल, वाघोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
युवकांना मिळणार उज्ज्वल भविष्याची दिशा – या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून तरुणांना योग्य करिअरची निवड करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. संस्थेचे संचालक प्रल्हाद वारघडे पाटील आणि सीमा वारघडे यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये: ही संस्था ZICA (Zee Institute of Creative Art), ZIMA (Zee Institute of Media Arts), Aptech Learning आणि National Institute of Fashion & Beauty यांसारख्या देशातील प्रमुख संस्थांचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखली जाईल. या संस्थेचा मुख्य उद्देश तरुणांना आयटी, ॲनिमेशन, मीडिया, फॅशन आणि ब्युटी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देणे हा आहे.
इन्स्टिट्यूटचे फायदे:100+ कोर्सेस: 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांपासून ते पदवीधरांपर्यंत 100 हून अधिक करिअर-ओरिएंटेड कोर्सेस उपलब्ध.सरकारी मान्यता: भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे.100% प्लेसमेंट: 100 टक्के प्लेसमेंट असिस्टन्स आणि 200 हून अधिक हायरिंग पार्टनर्स.मोफत मार्गदर्शन: डेमो सत्र, ऑन द स्पॉट ॲडमिशन, आकर्षक ऑफर्स आणि तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन सत्र.