वाघोलीतील बी.जे ल.एस. महाविद्यालयात ‘तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन 

Swarajyatimesnews

जिवंतपणी नका देऊ मृत्यूला आमंत्रण, करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, यासह अनेक आकर्षक व हृदयस्पर्शी तंबाखूमुक्तीचे संदेश देत पोस्टर स्पर्धा साजरी 

वाघोली :- दि. ३० डिसेंबर  भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयात एक समाजोपयोगी तसेचआजच्या काळात अत्यंत पथदर्शी व तरुणाईला व्यवसानांपासून दूर ठेवण्यासाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती या विषयावर  पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाई व नागरिकांना व्यसनांपासून लांब राहत स्वतःचे आरोग्य,आयुष्य व कौटुंबिक जीवन जपण्यासह सामाजिक जाणीव ठेवण्याचा संदेश देत पोस्टर स्पर्धा उत्साच्या वातावरणात पार पडली.

     या स्पर्धेचे उद्घाटन पि.डी सी सी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांधारे, संचालक व माजी पुणे  जिल्हा परिषद अध्यक्ष  प्रदीप कंद, हवेली बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, संचालक रोहिदास उंद्रे, संचालिका सारिका  हरगुडे, संचालक प्रविण घूले, संचालक सुरेश घुले, संचालक विकास , बी जे एस प्रकल्प व्यवस्थापन सुरेश साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गायकवाड, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष भंडारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

    तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत पोस्टर स्पर्धा व जनजागृती याबाबत बी जे एस महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील २२ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभागी होत. जनजागृती करत या पोस्टरमध्ये जिवंतपणी नका देऊ मृत्यूला आमंत्रण, करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, तंबाखू जीवनाचा शत्रू, कर्करोग व हृदयरोगाचे प्रमुख कारण, तंबाखूला नाही म्हणा कॅन्सर पासून स्वतःला वाचवा, तंबाखू मुक्ती हे ठेव धेय्य, शुद्ध पाणी हेच असू दे पेय, अल्पकाळातील तंबाखूच्या सात दुष्परिणामांची माहिती देत जनजागृती केली, तुम्ही थांबण्याच्या अगोदर धूम्रपान थांबवा, नो स्मोकींग नी ड्रिकिंग, यासह विविध विषयावर व्यसनाच्या दुष्परिणाम पोस्टर स्पर्धेत मुलांनी मांडली यावेळी मान्यवरांनी व वाघोली पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भेट देत विद्यार्थ्यांचे, महाविद्यालयाचे व स्पर्धेचे आयोजक अर्थशास्त्र विभाग व आरोग्य समिती प्रमुख प्रा.सुभाष शिंदे यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ संजय गायकवाड, डॉ माधुरी देशमुख, डॉ.सिद्धेश्वर गायकवाड, डॉ बळवंत लांडगे, डॉ मनीषा बोरा, डॉ भूषण फडतरे, डॉ. ज्यितिराम मोरे, डॉ. देविदास पाटील,डॉ सहदेव चव्हाण, डॉ.शिवाजी सोनवणे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा.शेवाळे रोहिणी यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पंच क्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!