l lनवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून देशभरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. व्हिडिओमध्ये एक चिमुकली मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या लष्करी जवानांकडे धावत जाते. ती त्यांच्या समोर उभी राहून प्रेमाने वर पाहते. जवानही हसत हसत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो. तेवढ्यात ती लहानगी अचानक खाली वाकते आणि त्या जवानाच्या पायाला हात लावून तो आपल्या कपाळाला लावते.
ही दृश्य पाहणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेते. त्यानंतर जवान तीला जवळ घेत प्रेमाने गालगुच्चा देतो. या क्षणात दिसणारी नाजूक भावना म्हणजे देशप्रेम आणि आदराचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या चिमुकलीच्या कृतीने लष्करातील जवानांप्रती असलेला आदर आणि प्रेम किती खोलवर रुजलेला आहे, हे यावरून दिसते.देशप्रेम,देशभक्ती, कृतज्ञता व संस्कार यांचा सुरेख संगम या व्हिडिओ मध्ये दिसून येतो.
हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर. भारतीय जवानांनी दाखवलेला शौर्य, शिस्त आणि निर्णायक कृतीमुळे पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला आहे. जवानांचे हे योगदान आज देशभरात नव्याने ओळखले जात आहे, आणि अशाच वेळेस चिमुकलीचा हा व्हिडिओ नागरिकांच्या मनात कृतज्ञतेची भावना दिसते.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला “भारताच्या भविष्याचे प्रतिबिंब”, “हीच खरी देशभक्ती” अशा शब्दांत गौरवले आहे. अशा व्हिडिओंमधून नागरिकांमध्ये लष्कराविषयीचा आदर आणि देशप्रेम यांचे surkh संगम दिसतो.
सदरचा व्हिडिओ हा Ravi Ranjan या ट्विटर अकाऊंट वरून शेअर करण्यात आला असून हजारो लोकांनी लाईक्स केल्या असून अनेकांनी छान कमेंट केली आहे.