मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन(ता. शिरूर) येथील ९६ वर्षांच्या आजीने व्हील चेअरवर बसून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला असून इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. वृद्ध आजी मतदानाला आल्याचे पाहून मतदारांना आनंद वाटला व मतदान करण्याची प्रेरणा मिळाली.यावेळी ९६ वर्षांच्या आजिसह, मुलगा व नातू यांनी एकत्रित तीन पिढ्यांनी मतदान केले.
वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना विधानसभा निवडणूकित वाडा पुनर्वसन येथे एका ज्येष्ठ महिलेने आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून मतदानाचा उत्साह मोठा होता. यावेळी वाडा पुनर्वसन येथील ज्येष्ठ महिला नागरिक श्रीमती यमुनाबाई काशिनाथ माळी वय वर्ष ९६ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
आतापर्यंत आजींनी १४ विधानसभेला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान ही लोकशाहीमध्ये पवित्र दान समजले जाते.
यावेळी त्यांच्या समवेत युवकांचाही मोठा मतदानाचा सहभाग होता. श्रीमती यमुनाबाई काशिनाथ माळी यांचा मुलगा प्रकाश काशिनाथ माळी व नातू स्वप्निल प्रकाश माळी या तीन पिढ्यांनी एकत्र मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माजी सरपंच नवनाथ माळी, पोलीस पाटील नितीन ढोरे, तरुण मतदार ऋतिक देशमुख, प्रणव दाभाडे, अक्षय माळी, तेजस माळी हे देखील उपस्थित होते.