श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य दीपोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी भक्तीचा,चैतन्याचा, त्यागाचा,शौर्याचा व बलिदानाचा एक एक दिवा लावण्यात आला.
यावेळी पंचक्रोशीतील अनेक गावातील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात येतो.यावेळी असंख्य महिला भगिनी ,धारकरी व वढू बुद्रुक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आकर्षक व मनमोहक अशी फटाकड्यांची आतषबाजी करण्यात आली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने अविनाश मरकळे,हरी शिवले, निखिल गव्हाणे,स्वप्निल शिवले, सोमनाथ शिवले,किरण गव्हाणे, अनिकेत सरडे व इतर धारकरी यांनी परिश्रम घेतले. फटाक्यांची भव्य आतशबाजी यावेळी समाधी स्थळी केली गेली व लेझर शो केला गेला.