शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण

Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी जेवतेय. मी झाल्यावर वाढते,” असे सांगितल्याने नामदेव यांना राग आला.

त्यांनी रागाच्या भरात मंगल यांना शिवीगाळ करत ओट्यावर ठेवलेल्या काठीने डोक्यावर मारले. या मारहाणीमुळे मंगल यांना दुखापत झाली आहे.या प्रकरणी शिरूर पोलिसांनी नामदेव बुलाखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार प्रताप टेंगले अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!