धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

स्वराज्य टाईम्स न्यूज

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा  १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर ८८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ६५/२ व बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम  ४,८,१२ नुसार संबंधित वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन वय १३ ते १४ वर्ष राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपी मूळचा जळगाव येथील आहे.

 याबाबत अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार दि. २५ रोजी मुलीचे वडील सकाळी अकरा वाजता कामाकरता निघून गेले होते, त्यानंतर दुपारी एक वाचण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती, घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली आली. त्यावेळेस महिलेस घराचा दरवाजा उघडा दिसला, म्हणून घरात पाहिले असता, घरातील बेडवर अल्पवयीन आरोपी याने मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले, पीडितेच्या आईला पाहिले त्यानंतर तो तिथून पळून गेला.मुलीच्या आईने मुलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सदर प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत.

सदर अल्पवयीन आरोपी हा मानसिक दृष्ट्या विकलांग असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून याबाबतीत पुढील  माहिती पोलीस तपासात निष्पन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!