कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालन व दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.
कोरेगाव भिमा येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.ग्राम पंचायत बाजार मैदान, विघ्नहर्ता चौक, होळकर वाडा,लिंब चौक, भैरवनाथ मंदिर चौक, आदर्श चौक , दोस्ती चौक ते पोलीस चौकी असे पाठ संचालन करण्यात आले.
यावेळी पोलिसांच्या जमाव नियंत्रणात आणणे, प्रसंगी लाठीचार्ज व अश्रू धुराच्या नळकांड्यांचा वापर तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित नेण्याचा सराव करण्यात येऊन दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचलन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, पोलीस उप निरीक्षक पंडित मांजरे, पोलीस हवालदार संदिप कारंडे व ४२ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच विजय गव्हाणे,विक्रम गव्हाणे, माजी ग्राम पंचायत सदस्य उमेश पाटील, भाजपचे संपत गव्हाणे, मधुकर कंद, नितीन पोपट गव्हाणे उपस्थित होते.