शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशन व बाल रंगभूमी परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच स्वप्नपूर्ती फाउंडेशन, ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान, नेत्र व शुगर तपासणी शिबिरास वृद्ध, महिला व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी लाठी काठी प्रशिक्षण देणारे तांबे सर, टोके सर, भूषण घोलप यांनी युवती, महिला भगिनी यांना लाठी काठी प्रशिक्षण देत सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत महिला सुरक्षिततेचे महत्व अधोरेखित केले.
या शिबिराचे उद्घाटन माहेर संस्थेच्या सिस्टर लुसी कुरियन, शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे,बाल रंगभूमीचे पदाधिकारी अरुण पटवर्धन, नारायण करपे ,देवेंद्र भिडे, मुग्धा वडके, माजी पंचायत समिती सदस्य दिपाली शेळके,स्वप्नपूर्ती फाऊंडेशन संचालक डॉ प्रशांत पोफळे, मंगेश चव्हाण, मंजुषा जोशी,राजेंद्र बोधे,वंदना रामगुडे, वैशाली गायकवाड, मेघा तांबे, अंकुश घारे,महेश शिर्के, जितेंद्र काळोखे, हार्दिक गडदे मोहम्मद तांबोळी पत्रकार राजाराम गायकवाड, निलेश जगताप, अतुल थोरवे उपस्थित होते.