शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Swarajyatimesnews

महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श  सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात  महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची लयलूट करण्यात आली तर या भव्य मेळाव्यास पाच हजारांच्या वर महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी दिली.

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त त्रिमूर्ती मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात भव्य हळदीकुंकू समारंभ, आरोग्य शिबिर व मार्गदर्शन, रोजगार विषयक मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिक्रापूर आणि पंचक्रोशीतील साडेचार ते पाच हजार महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची चर्चा शिक्रापूर परिसरात होत आहे .

यामध्ये “होम मिनिस्टर”  यामध्ये खेळ रंगला पैठणीचा तसेच महिला भगिनींनी आधुनिक व जुनी उखाणे घेत कार्यक्रम अत्यंत आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.यावेळी विजेत्या पहिल्या पाच महिलांना बक्षीस व पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले व ग्रामपंचायत सदस्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका यांचाही एक खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना कृष्णा सासवडे यांनी पटकावला व त्यांना सरपंच रमेश गडदे यांच्या वतीने पैठणी साडी देण्यात आली तसेच सर्व उपस्थितांसाठी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे उपसरपंच पूजा भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, माजी उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे,माजी उपसरपंच सारिका सासवडे, मोहिनी संतोष मांढरे, सीमा लांडे,मोहिनी युवराज मांढरे, वंदना भुजबळ, उषा राऊत, शालिनी राऊत, कविता टेमगिरे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व होम मिनिस्टर कार्यक्रम कुमारी ईश्वरी खैरे यांनी केले तर या  कार्यक्रमासाठी शिक्रापूर परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!