शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणाऱ्या एकाला मोटार दुरुस्तीच्या कारणाने बोलावून घेत जुन्या वादातून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणारे अजितकुमार जैसवार घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन मोटार दुरुस्ती करायची असल्याचे सांगत दुकानात बोलावून घेऊन चौघांनी अजितकुमार यांना शिवीगाळ करत तू मनोज काटे सोबत भांडणे का केले होते असे म्हणून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. परत जर मनोज काटे सोबत भांडणे कली तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. याबाबत अजितकुमार फुलचांद जैसवार (वय ३३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. भितरी केराकत ता. जैनपूर जि. जैनपूर उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे हे करत आहेत.