शिक्रापूर येथे धक्कादायक व दुःखद तसेच हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली असून या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला मद्यधुंद ट्रक चालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.(A shocking, sad and heartbreaking incident has taken place in Shikrapur, which has brought tears to the eyes of many. An incident has come to light where a drunk truck driver crushed a two-wheeler carrying his children to school. In this incident, two children, including the father, have met with an unfortunate end.)
शिक्रापूर चाकण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघात गणेश खेडकर ( वय वय ३५), तन्मय खेडकर (वय ९)आणि शिवम खेडकर (५) सर्व रा.पिंपळे जगताप अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत. आज सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शिक्रापूर – चाकण महामार्गावर अपघात झाला असून याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर – चाकण महामार्गावर सकाळी खेडकर हे आपल्या दोन चिमुकल्याना घेऊन शाळेत सोडवण्यासाठी दुचाकी क्र. एम एच १२ आर डब्ल्यू २१४६ निघाले होते. त्याचवेळी पशु खाद्य वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रक क्रं.एम एच १३ ए एक्स ३७३२ट्रक चालक ज्ञानेश्वर जीवन रणखांब याने दारूच्या नशेत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकने तिघांनाही चिरडले. शाळेमध्ये पोहचण्यापूर्वीच दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर नागरिक चांगलेच संतप्त झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. याप्रकरणी कुणाल मनोहर खेडकर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल आहे.सध्या याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ट्रक चालक वेगात वाहने चालवत असतात. त्यामुळे अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडतं आहेत.