सातारा हादरलं! एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने शाळकरी मुलीच्या गळ्यावर ठेवला चाकू, थरारक VIDEO व्हायरल

Swarajyatimesnews

सातारा: एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने सातारा शहरात (Satara City) अक्षरशः दहशत माजवली. एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून त्याने तिला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे केवळ सातारा पोलीस प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. “महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय? इथे कायद्याची भीती राहिली नाही का? महाराष्ट्राचा बिहार झालाय काय?” असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

 सातारा शहरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीला जबरदस्तीने पकडून, तिच्या गळ्याला चाकू लावून एका सनकी आशिकने (Obsessed Lover)  एकतर्फी प्रेमातून प्रचंड भीती निर्माण केली. परिसरातील नागरिक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो सर्वांना धमकी देत होता. सुदैवाने, या थरारक घटनेत उमेश आडगळे (Umesh Adgale) नावाच्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत मुलीचा जीव वाचवला. आडगळे यांनी मागून येत या माथेफिरू तरुणाच्या हातातील चाकू काढून घेत मुलीची सुटका केली. त्यानंतर, परिसरातील नागरिकांनी या तरुणास पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या झटापटीत मुलीच्या गळ्याला किरकोळ जखम झाली आहे.

हल्ला करणाऱ्या युवकावर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल – सुरुवातीला व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, आरोपी आर्यन वाघमळे (Aryan Waghmale) हा अल्पवयीन नसून त्याचे वय १८ वर्षे पूर्ण आहे. त्यामुळे त्याच्यावर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ आरळे गावचा असलेला आणि सध्या मोळाचा ओढा येथे वास्तव्यास असलेल्या आर्यन वाघमळेवर पोक्सो कायदा (POCSO Act), विनयभंग (Molestation), दुखापत करणे (Causing Hurt) आणि आर्म ऍक्ट (Arms Act) कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश आडगळे ठरले देवदूत – माथेफिरू युवक शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला ठार मारण्याची धमकी देत होता. त्यावेळी जमाव त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. घाबरलेली लहान मुलगी “वाचवा-वाचवा, मला सोड सोड” असे ओरडत होती. हे पाहताच, उमेश आडगळे यांनी आपला जीव धोक्यात घालून धाडस दाखवले. त्यांनी भिंतीच्या कठड्यावरून हळूवारपणे आत येत मुलाच्या हातातील चाकू हिसकावून त्याला खाली पाडले. त्यांच्या या धाडसामुळे मुलीला कोणतीही गंभीर दुखापत न होता, तिची सुटका झाली. यामुळे उमेश आडगळे हे त्या मुलीसाठी खरे देवदूत (Angel) ठरले आहेत.

https://x.com/pratapbhagawata/status/1947322424208556269

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!