सणसवाडीत राठी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: १२५ रक्तपिशव्या संकलित 

Swarajyatimesnews

आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी रक्तदान करत जोपासले सामाजिक उत्तरदायित्व

२० डिसेंबर , सणसवाडी (ता.शिरूर) येथे राठी ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॉलिबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराने परिसरात समाजसेवेचा उत्कृष्ट असा आदर्श ठेवला आहे. या भव्य शिबिरात १२५ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. पुण्यातील प्रसिद्ध इन्लॅक्स बुद्राणी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी शिक्रापूर ग्राम पंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी रक्तदान करत अपे सामाजिक उत्तरदायित्व जपत रक्तदान शिबिरात कृतियुक्त सहभाग नोंदविला यामुळे त्यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.

शिबिराच्या आयोजनासाठी राठी ग्रुप ऑफ कंपनीजचे व्हाइस प्रेसिडेंट श्रीकुमार दंडापानी यांच्या नेतृत्वाखालील टीमने उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमात सुदीश पलकौटे, करूनेश मिश्रा, शुभाशिष भट्टाचार्य, विशाखा केसरे, सोनाली धुमाळ, समिक्षा बदुकले, राकेश गारलेपती, निखिल थोरात, निलेश खंदारे, दादासाहेब पवार, संतोष नरके, आदेश वीर यांच्यासह एच आर आणि ॲडमिन टीमच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली. मागील दहा वर्षांपासून कंपनीचा हा आदर्श उपक्रम सातत्याने सुरू आहे.

रक्तदान शिबिरात सणसवाडी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. रक्तदानाचे सामाजिक महत्त्व लक्षात घेता, या शिबिराने आरोग्यसेवेचा सकारात्मक संदेश दिला. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाले, ज्यामुळे सर्व रक्तदात्यांना सहज आणि सुरक्षित पद्धतीने रक्तदान करता आले.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पातळीवरील अनेक स्वयंसेवकांनी देखील पुढाकार घेतला. शिबिरादरम्यान रक्तदात्यांना आरोग्य तपासणी, स्नॅक्स आणि प्रमाणपत्र देण्यात आले.  

या उपक्रमाबद्दल श्रीकुमार दंडापानी यांनी आनंद व्यक्त करत म्हणाले, “रक्तदान हे जीवनदान आहे. या शिबिराद्वारे आम्ही समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि भविष्यात असेच उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे.”  

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून राठी ग्रुप ऑफ कंपनीजने सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मकता आणि समाजसेवेचा नवा उत्साह निर्माण झाला आहे. 

यावेळी शिक्रापूर ग्राम पंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर,उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी उपसरपंच अजित दरेकर, उद्योजक दगडू दरेकर, एच आर.आदेश वीर व सहकारी टीम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!