भीषण अपघात ! चाकण शिक्रापूर मार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Swarajyatimesnews

चाकण – शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोहितेवाडी (ता. खेड गावच्या हद्दीत) भरधाव अवजड कंटेनरने समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला धडक दिली. अपघातात मिनी टेम्पो वाहनाचा चालक व एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.तर अपघातानंतर भरधाव कंटेनरने अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन रस्त्यालगतच्या कंपनीचे कंपाउंड तोडून नुकसान केले.On the Chakan-Shikrapur State Highway, a speeding heavy container hit a mini tempo vehicle coming from the opposite direction at Mohitewadi (within the limits of Khed village in Taluka Khed). The driver of the mini tempo vehicle and a passenger died on the spot in the accident. After the accident, the speeding container hit another four-wheeler and damaged the compound of a company located nearby.(Road Accident)

मोहितेवाडी हद्दीत बुधवारी (दि. २७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात वाहनचालक चेतन आहिरे (वय २७ रा. बुलढाणा) व त्यांच्या सोबत शेलपिंपळगाव येथून प्रवासासाठी बसलेले कपडे शिवणकाम व्यावसायिक गणेश मारुती पानसरे (वय ४२ रा. बहुळ ता. खेड) यांचा मृत्यू झाला आहे. अवजड कंटेनर (एमएच ०४ केयु ५३०६) भरधाव वेगाने शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे जात होता.

दरम्यान, मोहितेवाडी नजीक समोरून येणाऱ्या मिनी टेम्पो वाहनाला (एमएच १२ एसएक्स १७२६) कंटेनरने समोरासमोर जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने समोरच्या वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. तर हे वाहन उडून अन्य एका चारचाकी वाहनाला धडक देऊन लगतच्या चारीत कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान मद्यपान करून संबंधित कंटेनर चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Road Accident)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!