श्रीमंतयोगी वाद्यपथकाचा १० वर्षांचा जिव्हाळ्याचा उपक्रम”
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा येथील श्रीमंतयोगी वाद्यपथकाने पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयात जाऊन विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी दिव्यांगांसाठी” या उपक्रमातून पथकातील रणरागिणींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व त्यांच्यासोबत आनंद वाटला.
यावेळी विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, खाऊ आणि विविध भेटवस्तू देण्यात आल्या. “दिव्यांग मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करणे ही फक्त सामाजिक बांधिलकी नसून आमची जबाबदारी आहे,” असे पथक प्रमुख सागर गव्हाणे यांनी सांगितले.

श्रीमंतयोगी वाद्यपथक ट्रस्ट हे पुणे-नगर रोडवरील नावाजलेले ढोल पथक असून, गेली 10 वर्षे सातत्याने हा उपक्रम राबवत आहे.
कार्यक्रमास पथक संस्थापक सागर गव्हाणे पाटील, अध्यक्ष कालिदास शिंगाडे, अध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष योगेश ढगे, भाग्येश खोले, प्रथमेश मंगळे, आदेश चव्हाण, स्वप्निल गव्हाणे, अक्षय थिगळे, तसेच रणरागिणी प्रणिता लुनावत, निकिता स्वामी, मिनल परब, सोनाली देवनाळे, प्रतिक्षा साबळे, ऋतुजा चौधरी आदी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष योगेश ढगे यांनी मानले.