धक्कादायक ! पुण्यात जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा गळा दाबून खून तर नवऱ्यावर केले कायत्याने वार…

Swarajyatimesnews

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली, तर पतीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.(A heartbreaking incident has taken place in Daund taluka of Pune district. A woman strangled her two young children to death over a domestic dispute and seriously injured her husband by stabbing him with a sickle.) 

 मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी चिंचोली येथील शिंदे वस्ती येथे कोमल दुर्योधन मिंढे (वय ३०) या महिलेने आपल्या मुलांना – शंभू (वय १ वर्ष) आणि पियू (वय ३ वर्ष) – गळा दाबून ठार मारले. त्यानंतर पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) यांच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

ही भयंकर घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीतील वाद आणि सासरच्या त्रासाला वैतागून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी कोमल मिंढे यांना ताब्यात घेतले असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

जन्मदात्या आईच्या क्रूर कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप बालकांचा मृत्यू आणि पतीच्या जखमी अवस्थेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. या दुर्दैवी घटनेने दौंड तालुक्यात खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!