मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला. घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली.
यावेळी पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही. अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म, ता.खेड ) येथील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून अमानुषपणे खून केल्याप्रकरणी आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅण्डल मोर्चा काढला होता. आरोपी नवनाथ कैलास मांजरे ( वय २९ रा मांजरेवाडी धर्म, ता. खेड ) या नराधमाने अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यात टाकला.या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.