पुण्यात गिरक्या घेत हेलिकॉप्टर कोसळलं, हॉटेल गारवाजवळ घडली दुर्घटना

Swarajyatimesnews

जीवित हानी नाही.. चार प्रवासी जखमी

पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण करून आंध्र प्रदेशच्या विजयवाडाकडे जात असताना पुण्यातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ कोसळले. या दुर्घटनेत चार प्रवासी होते, ज्यापैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित दोघे स्थिर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील पौड भागात आज दिवसभर पावसाचा जोर होता, त्यामुळे हवामान खराब असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने आकाशात गिरक्या घेतल्याचे दिसले, त्यानंतर मोठा आवाज होत ते जमिनीवर आदळले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरु केले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.

हेलिकॉप्टरची माहिती – ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हेलिकॉप्टर मॉडेल AW 139

अपघातातील जखामिंची नावे -१. आनंद कॅप्टन (गंभीर जखमी, हॉस्पिटलमध्ये दाखल) २. दिर भाटिया (प्रकृती स्थिर)३. अमरदीप सिंग (प्रकृती स्थिर)  ४. एस. पी. राम (प्रकृती स्थिर)

Swarajyatimesnews
पौड येथे कोसळलेले हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू येथून हैदराबादच्या दिशेने जात असताना पुण्यातील गारवा हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, तांत्रिक तपासणी सुरू आहे. घटनास्थळी शंभरहून अधिक लोक जमा झाले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे.

 सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हेलिकॉप्टर कोसळण्यामागील कारण स्पष्ट होण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!