लाचलुचपत प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम
शिरूर– “कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व्हावे,” असे प्रतिपादन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद लोणारी यांनी केले. शिरूर येथे आयोजित जनजागृती उपक्रमात त्यांनी हे विचार मांडले.या जनजागृती उपक्रमाचे आयोजन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या उपक्रमादरम्यान लोणारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, “शासकीय कामांसाठी लाच देणे किंवा घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटनांची त्वरित तक्रार करावी.” लोणारी पुढे म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. प्रत्येकाने आपल्या हक्कांसाठी जागृत राहावे आणि लाच न देण्याचे ठरवावे.” या उपक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या का
र्यकर्त्यांनी देखील सहभाग नोंदवला. त्यांनी शासकीय कार्यालयांत, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, आणि पोलिस ठाण्यांमध्ये जनजागृती पत्रके चिकटवली. यासाठी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला शिरूर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संपत नाना फरा, तालुका पालक तुकाराम फराटे, सुनील कदम, सचिव पंकज बांगर, अशोक मोरे, पर्वतराज नाबगे, विशाल गव्हाणे, राहुल दिघे आणि तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.लाचलुचपत प्रतिबंधक जनजागृतीतून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल!