खेळाडूंना आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देणार – कृषी मंत्री दत्ता भरणे

Swarajyatimesnews

 लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेती हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.न्यू टाइम स्कूल यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत भूमकर कुटुंबीयांचे कौतुक केले. 

खेळाडूंना पाठबळ देण्यावर भर – मंत्री भरणे यांनी लोणीकंद येथील कार्यक्रमात बोलताना, पूर्वी आपण क्रीडामंत्री असताना खेळाडूंना पाठिंबा दिला होता आणि आता कृषीमंत्री म्हणूनही खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं सांगितलं.

लोणीकंद येथे झालेल्या या तीन दिवसीय सीबीएसई शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सुमारे तीन हजार खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते. यात बॅडमिंटन आणि तायक्वांदो या खेळांचा समावेश होता. या सोहळ्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगार्डे, संचालक प्रवीण शिंदे, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला आणि शेतकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न – यासोबतच, मंत्री भरणे यांनी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे महिलांसाठी आयोजित एका कार्यक्रमात कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी महिलांना त्यांची खरी ताकद मानून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं वचन दिलं.

त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्याचं आणि पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं आश्वासनही दिलं. तसेच, रासायनिक खतांच्या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर योग्य कारवाई करण्याची ग्वाही दिली.

सीबीएसई क्रीडा स्पर्धेत ३ हजार खेळाडूंचा सहभाग – मारुती भूमकर 

श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  मारुती भूमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित तीन दिवसीय सीबीएसई शालेय क्रीडा स्पर्धेत देशभरातील सुमारे ३,००० खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये, बॅडमिंटन खेळासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील, तर तायक्वांदो खेळासाठी पुणे, बंगळूर, तिरुअनंतपूरम आणि केरळ राज्यातील खेळाडूंनी भाग घेतला.भूमकर यांनी सांगितले की, श्री रामचंद्र शैक्षणिक संकुलात याआधीही विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे शालेय खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यात वाढ होते आणि त्यांना प्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते.या कार्यक्रमात उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवल्याबद्दल त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गडेसंचालक प्रवीण शिंदे,आंबेगाव व हवेली क्रीडा अधिकारी शोभा पालवे, विशेष कार्यकारी अधिकारी भरत खेडेकर, द्राक्ष उद्योजक संघटना अध्यक्ष भारत बापू शिंदेउद्योजक सुमित बाजारे, आदित्य गायकवाडश्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक पांडुरंग भुमकर, गौरव भुमकर, अथर्व भूमकर, शैलजा भूमकर, मृणाल भूमकर,उपखजिनदार स्वप्निल भुमकर सोनाली बाजारे, सायली गायकवाड, न्यू टाइम्स स्कूलच्या प्राचार्या रितिका नायडू, सुभद्राबाई रामचंद्र भूमकर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ढंगेकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!