गेली १५ वर्षे मोठ्या भावाप्रमाणे आपण शिरूरला संधी दिली. आता लहान भावाची वेळ आहे. हवेलीला नक्की संधी मिळणार
माऊली कटके यांच्या सांगता सभेला अलोट व अभूतपूर्व गर्दी
वाघोली (ता. हवेली)”पैशाने वाघोलीकरांना विकत घेता येईल, असा समज करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला गेलेला नाही, आणि मायमाऊलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे,” असे भावनिक आवाहन करत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर-हवेली मतदारसंघात विजयाचा विश्वास व्यक्त केला.
सोमवारी (दि. १८) वाघोली येथे झालेल्या सांगता सभेत हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. महायुतीचे उमेदवार म्हणून कटके यांचा प्रचार हा वाघेश्वर मंदिरापासून सुरू होऊन गावठाण मार्गे केसनंद फाट्यावर समाप्त झाला. पदयात्रेत महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
“लहान भावाची वेळ आहे” – माऊली कटकेसभेला संबोधित करताना कटके म्हणाले:”गेली १५ वर्षे मोठ्या भावाप्रमाणे शिरूरला संधी दिली. आता लहान भावाची वेळ आहे. आपल्या गावाचा पहिल्यांदाच आमदार होण्याचा ऐतिहासिक क्षण आहे. आता वेळ आली आहे की वेठीस धरू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी.” यापूर्वीच्या अपूर्ण विकास कामांवर टीका करत, “सामान्य जनतेला फसवणाऱ्या आश्वासनांना आता उत्तर द्यायचं आहे,” असे सांगून मतदारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.
“वाघोलीकरांचा स्वाभिमान जागृत आहे – कटके यांनी जनतेच्या भावना अधोरेखित करत सांगितले”वाघोलीचा भूमिपुत्र विकला जाऊ शकत नाही. पैसा तुमच्याकडे असेल, पण लोकांचा विश्वास आणि प्रेम माझ्या पाठीशी आहे.”सभेला उत्स्फूर्त प्रतिसादवाघोलीतील हजारोंच्या उपस्थितीने कटके यांच्या प्रचाराला अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याने सभेतील उत्साह आणि नागरिकांचा विश्वासात्मक प्रतिसाद पाहता, २० तारखेला माऊली कटके यांच्या विजयाचा गुलाल उधळणार असून शिरूर हवेलीच्या विकासासाठी व वाघोलीकरांच्या स्वाभिमानासाठी भूमिपुत्र माऊली कटके यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
म्हसोबा महाराजांच्या साक्षीने सांगतो, माऊलीच आमदार होणार! – प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी माऊली कटके यांच्या विजयासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे. प्रचार सभेत कंद म्हणाले: “म्हसोबा महाराजांच्या साक्षीने सांगतो, माऊलीच आमदार होणार! हा विजय शिरूर-हवेलीच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे.
महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग – सांगता सभेला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद दिसून आला. महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा उल्लेख करत कटके यांनी शेतकरी, कामगार, आणि सामान्य जनतेसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी महाकाल च्या घोषणा देण्यात आल्या तर तरुणांनी माऊली माऊली अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडत आपला पाठिंबा व्यक्त केला.
शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचाराची सांगता सोमवारी (दि. १८) जोरदार शक्तीप्रदर्शनाने मतदार संघातील सर्वाधिक मतदार असणार्या वाघोली येथे झाली. आजच्या प्रचाराचा शेवटच्या दिवशी वाघोली परिसरातील भावडी, लोणीकंद, बकोरी, केसनंद, कोलवडी, आव्हाळवाडी या गावांमध्ये दिवसभर गाव भेट दौर्यामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद पहावयास मिळाला.
त्यानंतर दुपारी वाघोली येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वाघेश्वर मंदिर येथून सुरुवात झाल्यानंतर वाघोली गावठाण मार्गे केसनंद फाटा येथील कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर प्रचाराची सांगता झाली, यावेळी महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे पाहायला मिळाले. आयोजित पदयात्रेत वाघोलीतील महिला, तरुण, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, संदीप सातव यांसह महीयुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समोर महिला वर्ग तरूण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.