पुणे जिल्ह्यासाठी कोरेगाव भीमा ‘पथदर्शी’! कचरा प्रकल्पापासून डिजिटल सेवेपर्यंत ‘आदर्श ग्राम’ ठरेल – सीईओ गजानन पाटील

Swarajyatimesnews

 सरपंच संदीप ढेरंगे यांची सर्वांगीण विकासदृष्टी; अशक्य ते शक्य करुन दाखवत  वनखात्याची जमीन मिळवली!

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : मेहनत, दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. येथील उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डिजिटल सेवा प्रणाली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी ठरेल, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी काढले.

कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या  विकासकामाचे उद्घाटन व शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरपंच संदीप ढेरंगे यांच्या विकासकार्याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले. “सरपंच संदीप ढेरंगे यांनी विकासाची दृष्टी ठेवत गावचा सर्वांगीण विकास करण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे. या ग्रामपंचायतीचे काम व विकासाचा दृष्टिकोन एकदिवस पुणे जिल्ह्यासाठी पथदर्शी व मार्गदर्शक ठरणार,” असे मत गजानन पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी  सरपंच संदीप ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे,अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे,घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे , माजी सरपंच अमोल गव्हाणे ,ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कचरा वर्गीकरण प्रकल्प आणि डिजिटल सेवेची त्रिसूत्री – सीईओ पाटील यांच्या हस्ते कचरा प्रकल्पाचे उद्घाटन, ग्रामपंचायत वेबसाईटचे लोकार्पण आणि महिला आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी या तीनही उपक्रमांचे विशेष कौतुक केले:

१. पथदर्शी कचरा प्रकल्प: गावातील कचरा एकत्रित गोळा करून त्याचे वर्गीकरण आणि त्यावर करण्यात येणारी प्रक्रिया अत्यंत उत्तम आहे. ही यंत्रणा आगामी काळात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरेल.

२. डिजिटल क्रांती: कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या आठ अ व प्रत्येक कुटुंबाच्या कर आकारणी कागदपत्रांवर क्यूआर कोड प्रणालीचा वापर करून ग्रामपंचायत  डिजिटल करण्यात आली. तसेच कोरेगाव भिमा ग्रामपंचायतची वेबसाईट ही अतिशय उत्तम असं तिचे निरीक्षण सीईओ गजानन पाटील यांनी वीस मिनिटे केले.ही सर्वोत्तम वेबसाईट ग्रामस्थांना घरपोच विविध सेवा सुविधांचा लाभ मिळवून देईल. असा विश्वास व्यक्त केला.

३. आरोग्य ग्राम: महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करून ‘समृद्ध आरोग्य ग्राम’ ची सुरुवात करण्यात आली आहे, ज्यामुळे आरोग्य सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

सरपंच ढेरंगे यांनी अशक्य ते शक्य केले – गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी वनखात्याची (फॉरेस्टची) जमीन मिळवणे हे जवळपास अशक्य मानले जाते. मात्र, सरपंच संदीप ढेरंगे यांनी अथक पाठपुरावा करून ते शक्य करून दाखवले.गजानन पाटील यांनी सरपंच ढेरंगे यांच्या या  कार्याबद्दल त्यांचे कौतुक करत, ग्रामस्थांनी एकत्रित येत गावाचा नावलौकिक आणि सर्वांगीण विकास करण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले.

कोरेगाव भीमा ग्रामपंचायत आता कचरा व्यवस्थापन, डिजिटल प्रशासन आणि जलव्यवस्थापन या त्रिसूत्रीमुळे पुणे जिल्ह्यातील आदर्श गाव बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!