कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गावातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले सुपुत्र संतोष घावटे यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावत त्यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या यशानिमित्त ग्रामपंचायतीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
संतोष घावटे यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि निष्ठावंत सेवेतून पोलीस दलात लौकिक मिळवला आहे. त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदावरची बढती ही केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण कोरेगाव भीमा व शिरूर तालुक्याचा अभिमान आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गावकऱ्यांनी संतोष घावटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहारांनी सत्कार केला. यावेळी गावात जल्लोषाचे वातावरण होते आणि ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमानाची झळाळी होती.
या प्रसंगी सरपंच संदीप ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजेंद्र ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे, माजी चेअरमन अशोक गव्हाणे, बबूशा ढेरंगे, रमेश गव्हाणे, सुनील गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ॲडिशनल एसपी अरविंद गोकुळे यांची उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.
ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामस्थ सुनील पटेकरी, जयकांत देशमुख, बापू झांबरे, तिरसिंग नानगुडे, बाळासाहेब नानगुडे, बजरंग घावटे, ओमकार घावटे, रोहन घावटे आदींनी संतोष घावटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले