कोरेगाव भिमा येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळणारा प्राणी सिंह नव्हे तर  बिबट्याच – स्मिता राजहंस

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा, ता. २० : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान वन विभागाने मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आहे.

     कोरेगाव भीमा येथील गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घराजवळ १९ डिसेंबरला रात्री २.४५ वाजता एक सिंह सदृश्य प्राण्याने कुत्र्याची शिकार करून चार ते पाच मिनिटे थांबल्यानंतर कुत्र्याला तोंडात धरून रानात ओढत नेले. हा प्राणी सिंहासारखा दिसत असल्याच्या शक्यतेने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

       दरम्यान कोरेगाव भीमा येथील घटनास्थळी व शेतकऱ्याच्या घराजवळ तातडीने पाहणी करण्यात आली असून संबंधित प्राण्याच्या पायांचे स्पष्ट ठसे मिळालेले नाहीत. मात्र सीसीटीव्ही फुटेज नुसार हा सिंह नसून बिबट्याच असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पिंजरा लावण्यासह वनखात्याकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!