कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये जागतिक फार्मासिस्ट दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरेगाव भीमा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करून पथनाट्य सादर केले. तसेच स्थानिक मेडिकल शॉपमधील फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वृक्षारोपण आणि खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील विविध फार्मसी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला.
कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष नासिर शेख, सहसचिव जाहिद शेख, सीईओ अमीर इनामदार, तसेच प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी शुभेच्छा दिल्या तर विभाग प्रमुख सोनल सातव यांनी सर्वांचे आभार मानले.