सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी तातडीने भेट देत तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
कोरेगाव भिमा येथील गणेशनगर येथे लोकवस्तीच्या ठिकाणी कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सांडपाणी गटार लाईन मधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त गटाराचे काळे पाणी बाहेर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून या पाण्यामधून नागरिक,शालेय विद्यार्थी व महिला भगिनी तसच कामगार वर्गाला जावे लागत असल्याने कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने सदर गटार लाईन दुरुस्तीसह दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर येण्याचे तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली व काही वेळातच कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे, ग्राम पंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी तातडीने भेट देत पाहणी करत नागरिकांना सदर समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

सांडपाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने यामुळे डास व इतर साथीचे रोग पसरण्याची व लहान मुले, महिला, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने सदर गटार लाईन दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय कशिद, सुनील लिमगुडे, अक्षय वाबळे,सौरभ जठार, सचिन चव्हाण, अजय जाधव, योगेश क्षिरसागर, अंकुश चंदनशिवे, पोपट खट्याळ,मनीष परब यांनी केली
गणेशनगर येथील सांडपाणी गटार लाईनीची प्रत्यक्ष पाहणी केली असून सदर समस्या तातडीने सोडवण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थ हे कुटुंबीय असून माझ्या कुटुंबातील कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही यासाठी कर्तव्य दक्ष राहणार आहोत. – सरपंच संदिप ढेरंगे