कोरेगाव भिमा (ता. शिरूर) परिसरातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार व सभासदांच्या अनेक महत्वपूर्ण गरजांना उभे राहत त्यांच्या अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून मागील ३५ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठलराव ढेरंगे यांनी संस्थेच्या ३५ वार्षिक सभेच्यावेळी केले.
कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष शांताराम फडतरे,शिवाजी राऊत, नामदेव विटकर, प्रकाश ढेरंगे, संजय फडतरे,कृष्णा ढेरंगे, मंजुळा ढेरंगे, वृषाली ढेरंगे या संचालक मंडळाच्या मुख्य उपस्थितीत व व्यवस्थापक तनुजा मदगुले, राजेंद्र वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.
यावेळी चेअरमन नामदेव ढेरंगे यांनी संस्थेच्या सभासदांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या पूर्ण करणे आमचे कर्तव्य असून अधिकाधिक सुविधा देणे, बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देणे व संस्थेच्या प्रती विश्वास वाढवणार असल्याचे सांगितले.
कानिफनाथ संस्थेला ‘अ’ दर्जा ऑडिट वर्ग असून ७३ लाख २० हजारांचे कर्ज वाटप तर ९६ टक्के वसुलीसह ८टक्के लाभांश देणारी व मोठ्या प्रमाणावर सभासद असणारी ग्रामीण भागातील मोठी पतसंस्था असुन समृद्ध व्यवस्थापन, तत्पर कार्यपद्धती, अखंड सहकार्य,आधुनिक विचारप्रणाली व व्यवहार कुशलता या पंच सुत्रीचा प्रभावी वापर करत सभासदांची उत्पादकता वाढवण्यासाठी कर्जसहाय्य करणे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा शिवाजी माधव ढेरंगे, शिवाजी बापूराव ढेरंगे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे,श्यामराव गव्हाणे,रमेश ढेरंगे, समीर इनामदार, आप्पा ढेरंगे, तिरसिंग जवळकर, विठ्ठल शिंदे,उपस्थित होते.