Swarajyatimesnews

नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!”…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे फुलांच्या वर्षावात पहिलीतल्या चिमुकल्यांचे शाळेत स्वागत

“मुलं तुमची, झाडं आमची” उपक्रमाने पालकही आनंदी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. बालचमु आनंदाने शाळेत दाखल होताना पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने सुवासिनींनी ओवाळून करण्यात आले. फुलांच्या वर्षावात आणि वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला….

Read More
Swarajtatimesnews

सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म

सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म शिरुर तालुक्यातील शिक्रापूरजवळील मलठण फाटा परिसरात सर्पमित्राच्या गाडीतच एक अतिविषारी घोणस जातीचा साप मादी असल्याचे लक्षात येताच मोठा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. या सापाने थेट कारमध्ये ठेवलेल्या बरणीतच तब्बल २७ पिल्लांना जन्म दिला असून, या दुर्मीळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाच्या सरी सुरू असताना…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर हत्याकांड : प्रेमसंबंधातून महिला व दोन मुलांची हत्या, आरोपी अटकेत

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हद्दीत २५ मे रोजी एका बंद कंपनीमागे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिला आणि दोन मुलांच्या मृतदेहांचे गूढ पुणे ग्रामीण पोलिसांनी उलगडले आहे. प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथा परिसरात निर्जन ठिकाणी हे मृतदेह सापडल्याने सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे पोलिसांसाठी…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!

“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…

Read More
Swarajyatimesnews

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा

वढू बुद्रुक (ता. शिरूर) “सामाजिक कार्य हीच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी आपला वाढदिवस वंचित आणि उपेक्षित घटकांप्रती कळवळा दाखवत, वढू बुद्रुक येथील माहेर सामाजिक संस्थेत उत्साहात साजरा केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी केवळ एक दिवस नव्हे, तर आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारणी नव्हे, समाजाच्या…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये बंद घर फोडून ६२ हजारांचे दागिने चोरीला

शिरूर शहरातील गुजरमळा भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २४ मे रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत घडली. माधुरी नारायण तरटे (वय ३५, रा. गुजरमळा, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान 

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
error: Content is protected !!