फुलगावमध्ये गाईच्या दोरीचा फास बसल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत

Swarajyatimesnews

फुलगाव (ता.हवेली) अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात गाईला बांधलेली दोरी अडकली. याचवेळी गाई पळत सुटल्याने चिमुकला ओढत नेल्याने डोक्याला जोरदार मार लागल्याने व गळ्याला फस बसल्याने गंभीर जखमी होवून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. सदरची घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.(An eight-year-old boy playing in the courtyard of Phulgaon (Haveli Taluka) got caught in the hand of a rope tied to a cow. At the same time, the cow ran away and dragged the child, causing serious injuries to his head and neck, resulting in the child’s heartbreaking death. The incident took place at Phulgaon in Haveli Taluka of Pune on Monday evening around 6 pm.)

हवेली तालुक्यातील फुलगाव येथील शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असे सदर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव (Pune News) आहे. शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील गाईला बांधलेली दोरी हातात घेतली. हि दोरी मोठी होती. मात्र यावेळी गाई पळत सुटल्याने या दोरीचा शौर्यच्या गळ्याभोवती व अंगावर फास बसला. यामुळे तो गाईच्यामागे दोरीमुळे ओढत गेल्याने त्याला जबर मार लागला.  एकुलता एक मुलगा गमावला

घटना घडली यावेळी शेजारील महिलेने पाहिले असता मुलगा कोणाचा यावरून पाच ते दहा मिनिटात सर्व जमा झाले तेव्हा शौर्य गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला. मात्र त्यापूर्वीच त्याचा (Death) मृत्यू झाला. तो फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. लोणीकंद पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!