धक्कादायक! शिरूर तालुक्यात एकाला 84 लाख 34 हजारांना ऑनलाईन गंडा

Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात एका नोकरदाराला रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 84 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. मूळच्या चंद्रपूर येथील असलेल्या व सध्या शिरूर शहरात बागवान नगर मध्ये राहत असलेल्या प्रकाश विनायक धामणकर या 43 वर्षीय व्यक्तीला अशा पद्धतीने गंडविण्यात आले आहे.(In Shirur taluka, a government employee was duped of Rs 84 lakh 34 thousand by claiming to be a Reserve Bank officer. Prakash Vinayak Dhamankar, 43, originally from Chandrapur and currently residing in Bagwan Nagar in Shirur city, was duped in this manner.)

प्रकाश विनायक धामणकर, (वय 43 वर्षे, रा. बागवान नगर, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे, मुळ रा. चिंचाळा एम.आय.डी.सी ता. जि चंद्रपुर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने वेगवेगळी कारणे देऊन वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेण्यात आले आहे. आय.डी.बी.आय बँकेवरून. आय या बँक अॅप मध्ये 20 लाख AMAN KUMAR या आय.डी. वर ट्रान्सफर केले. त्यानंतर फायनल स्टेप ऑफ व्हिरेफिकेशन या नावने MANPURIA AGRO P या आय. डी. वर 11 लाख 70 हजार ट्रान्सेंर केले. व मला सांगितले डी.सी.पी. साहेब यांनी सांगितले आहे की, म्युचल व शेअर्स मध्ये पैसे असल्याने तुमचे व्हिरीफिकेशन पूर्ण होत नाही.

त्यांनतर त्यांना म्युचल फंड व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकण्यास सांगितले. म्युच्युअल फंड मधील पैसे काढले व शेअर्स मार्केटचे शेअर्स विकुन 39 लाख 84 हजार ऐवढे आय. सी. आय सी.आय बँकेत घेतले व त्यानंतर अपेक्षा हॉस्पिटल या आय.डी. वर 20 लाख रुपये, तसेच LLTAJ Rali या आय. डी. वर 6 लाख 84 हजार, तसेच MAHENDRA BISHNO या अंकाउंटवर 10 लाख रुपये, DHIRENDRA/YESB0000263 या आय.डी. वर 3 लाख ट्रान्सफर करून घेतले.

त्यांनतर त्यांनी सांगितले की, तुमचे आज शेवटचे व्हिरीफिकेशन आहे. पर्सनल लोन काढावे लागेल असे सांगितले व तुम्ही पर्सनल लोनकरीता अॅप्लीकेशन करा असे सांगितल्याने ऑनलाईन. नंतर पर्सनल लोन आय.सी. आय बँकेने लोन 12 लाख मंजुर केले व PANGYA digit या आयडीवर 11 लाख 80 हजार ट्रान्सफर करुन घेतले तसेच,

pandya digit या आयडीवर 1 लाख रुपये असे वेगवेगळ्या अकाउंट वरुन तब्बल 84 लाख 34 हजार रुपये पाठविण्यास सांगुन ऑनलाईन फसवणुक करण्यात आली. अशी फिर्याद प्रकाश विनायक धामणकर यांनी शिरूर पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!