दिनांक ५ मार्च – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.
पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन महिलेच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला.त्यांनतर ओंकार याने दहा दिवसाने पुन्हा महिलेच्या घरी येत महिलेला मारहाण करत दुखापत करुन महिलेवर बलात्कार केला.
याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली. पुढील. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.