विस फूट लांब व १५० किलोंचा गुलाब पुष्पांचा हार घालत आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद मिळत तालुक्यात लाल दिव्याची गाडी येवो – सणसवाडी करांच्या शुभेच्छा
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ व अशोक पवार यांच्या जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध याचा पुन्हा एकदा परिचय आला असून सणसवाडी करांनी वाढदिवसानिमित्त २० फूट लांब व १५० किलोंचा गुलाब पुष्पांचा हार भेट देत आमदार अशोक पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी आमदार अशोक पवार यांच्या सारखा अभ्यासू हुशार, मनमिळावू, निष्ठावान, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकासाच्या बाबतीत आग्रही असलेले आमदार अशोक पवार हे पुन्हा एकदा बहुमताने निवडून येतीलच पण त्यांच्या निष्ठा व प्रामाणिक पणाची दाखल घेण्यात येऊन त्यांना मंत्री पदाची संधी मिळावी व तालुक्याचा पुन्हा एकदा सर्वांगीण विकासाचा आलेख गतीने उंचवावा अशा शुभेच्छा सणसवाडी करांनी दिल्या.

मंत्रालयाच्या प्रतिकृतीचा केक देत शुभेच्छांचा वर्षाव – आमदार अशोक पवार यांची निष्ठा,प्रामाणिकपणा व जनतेच्या हितासाठी व्यापक केले काम,विकास कामांचा चढता आलेख व सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी यामुळे आमदार अशोक पवार यांना आगामी काळात मंत्रिपद मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय,पुढे लाल डी यांच्या गाड्या आणि आमदार अशोक पवार यांच्या प्रतिकृती केक साकारत अनोख्या शुभेच्छा सणसवाडी करांनी दिल्या.

आमदार अशोक पवार यांनी कोरोना काळात केलेले काम, महापुराच्या काळात जपलेली माणुसकी व सामाजिक बांधिलकी, मोडलेल्या संसाराला हातभार लावण्यासाठी दिलेले संसारोपयोगी साहित्य, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळाचा विकास आराखडा ,रेशनिंग पद्धत ऑनलाईन, हॉस्पिटल बाबत केलेली व्यापक मदत, दर्जेदार विकासकामे यामुळे सर्वसामान्य जनता आमदार अशोक पवार यांच्या निष्ठा,प्रामाणिकपणा व रचनात्मक विकास कामामुळे आनंदी असून आगामी काळात त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडावी अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य माजी पंडित दरेकर, मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे , सरपंच रूपाली दरेकर उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी सरपंच संगीता हरगुडे, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे राहुल हरगुडे , ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, शशिकला सातपुते काँग्रेसचे वैभव यादव, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन सुहास दरेकर ,बबुशा दरेकर, कैलास दरेकर, गोरक्ष दरेकर गजानन हरगुडे, सुरेश हरगुडे, माजी उपसरपंच गणेश दरेकर, संभाजी साठे, ग्रामपंचायत माजी सदस्य अनिल दरेकर आनंदराव दरेकर,गणेश कानडे उद्योजक दगडू दरेकर,नवनाथ दरेकर, रामदास दरेकर, शरद दरेकर, भानुदास दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर, निलेश दरेकर,विठ्ठल दरेकर,योगेश दरेकर, संतोष दरेकर, अविनाश वाडेकर, विक्रम दरेकर, बाळकृष्ण दरेकर, बाळासाहेब मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिता दरेकर, उद्योजक विकास हरगुडे, बबन दरेकर, उत्तम दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, हनुमंत दरेकर, दादा वाखारे, पंढरीनाथ गोरडे, अशोक करडे, मयुरी रेसिडेन्सी चेअरमन वंदना दरेकर व्हाईस चेअरमन मंगल शेळके संचलिका छाया गादगी, संचालक अशोक खवले व मान्यवर व सणसवाडी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते