शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले.
शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता एम एस सी बी अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने अवघ्या २४ तासांच्या आतमध्ये डी.पि बदलत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने नागरिकांनी सरपंच रमेश गडदे यांचे आभार मानले.
यावेळी आदर्श सरपंच रमेश गडदे ,ग्राम पंचायत सदस्य त्रिणयन कळमकर, महावितरणचे अधिकारी मुख्य अभियंता नितीन महाजन, उपअभियंता भगवान विथाटे, वायरमन ढाकरे, चव्हाण, भालेराव, स्थानिक नागरिक डॉ हेमंत दातखिळे व इतर मान्यवर उपस्थित होते.