एकल महिला’ अभियानाची शपथ घेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
शिक्रापूर (ता. शिरूर) शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण ग्रामपंचायत परिसर दुमदुमून गेला होता.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, शासनाच्या ‘एकल महिला’ या अभियानाचे स्वागत करून उपस्थित सर्व नागरिकांना या मोहिमेची शपथ देण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. ‘जय जवान, जय किसान’ आणि ‘प्रजासत्ताक दिनाचा विजय असो’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला.
या सोहळ्याप्रसंगी उपसरपंच वंदना भुजबळ, सारिका सासवडे, पूजा भुजबळ, सुभाष खैरे, मयूर करंजे, पंचायत अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, उद्योजक दीपक भुजबळ, विलास जासूद गुरुजी, तलाठी शरद गाडे, कृषी अधिकारी संध्या सांडभोर, डॉ. प्रतीक्षा आठवले, जाधव सिस्टर यांसह सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताच्या सुरावलीत आणि तिरंग्याच्या साक्षीने शिक्रापूरकरांनी आपला राष्ट्रीय सण मोठ्या अभिमानाने साजरा केला.
