अजित ‘दादां’चा शब्द अन् राष्ट्रवादीची सरशी; मांढरेंची माघार, तर भाजपची मोठी नाचक्की!

Swarajyatimesnews

शिक्रापूर (ता. शिरूर) पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक १८  मध्ये अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार माऊली कटके यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर विद्यमान सदस्य कुसुम आबाराजे मांढरे यांनी बंडाचे निशाण खाली घेत माघार घेतली. मात्र, याच वेळी भाजपला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवाराची माघार आणि पंचायत समिती उमेदवाराने ‘कमळ’ सोडून ‘घड्याळ’ हाती घेतल्याने तालुक्यात भाजपची नामुष्की झाली आहे.

हा अजित दादाचा शब्द आहे!’ : या गटात माजी सभापती मोनिका हरगुडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने कुसुम मांढरे बंडाच्या तयारीत होत्या. मात्र, अजित पवार यांनी “आबा, तुमच्या त्यागाची पक्ष दखल घेईल, हा माझा शब्द आहे,” अशी ग्वाही दिल्याने मांढरे यांनी पक्षनिष्ठा जपत माघार घेतल्याची माहिती धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे यांनी दिली. या शिष्टाईत जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आणि रवींद्र काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

धनुष्यबाण-कमळ घेऊन निघाले, पण हातात घड्याळ  : अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिक्रापुरात मोठी रंजकता पाहायला मिळाली. धनुष्यबाण आणि कमळ हाती घेऊन निघालेले पंचायत समितीचे उमेदवार थेट ‘घड्याळाचा’ (राष्ट्रवादीचा) एबी फॉर्म भरून बाहेर आले. आता जिल्हा परिषद उमेदवारानेही माघार घेतल्याने भाजपच्या गोटात शुकशुकाट पसरला आहे. या ‘गुगली’मुळे सणसवाडी गणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथली आहेत.

राष्ट्रवादीची तटबंदी मजबूत : कुसुम मांढरे यांच्या माघारीमुळे मोनिका हरगुडे यांचा मार्ग सुखकर झाला असून राष्ट्रवादीने आपला बालेकिल्ला अधिक भक्कम केला आहे असे असले तरी  कळमकर यांच्यामागे उभी असणारी सामाजिक व राजकीय धुरंधर ताकद तसेच अनेक लोकांचा छुपा पाठिंबा आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे ही लढत थेट लढत होणार असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.ही लढत एकाकी वाटत असली

l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!