गावच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘नवरा–बायको’ सरपंच होण्याचा मान सातपुते कुटुंबाच्या नावावर
कोरेगाव भीमा –उद्योगनगरी सणसवाडी (ता. शिरूर) येथे सरपंच रूपाली दगडू दरेकर यांनी नियोजित वेळेत राजीनामा दिल्यानंतर नव्या सरपंचपदासाठी झालेल्या प्रक्रियेत शशिकला रमेश सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कोणतीही स्पर्धा नसल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी. डी. शेख मॅडम यांच्या देखरेखीखाली पार पडली, तर ग्रामसेवक संतोष गायकवाड यांनी आवश्यक मदत केली.
“ग्रामस्थांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे. सणसवाडीचा विकास, सेवा-सुविधांचा विस्तार आणि भावी पिढी घडवणे हेच माझे प्राधान्य राहील.” – नवनिर्वाचित सरपंच शशिकला रमेश सातपुते, सणसवाडी
उपसरपंच राजेंद्र दरेकर यांनी या निवडीबद्दल बोलताना म्हटले, “पदे कुणालाही मिळू शकतात, पण मन मोठं असावं लागतं. सरपंच रूपाली दरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शब्द पाळत योग्य वेळी राजीनामा देऊन मोठेपणा दाखवला.”
विजयी मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण – निवड जाहीर होताच सणसवाडीत जल्लोषाचे वातावरण पसरले. ढोल-ताशांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी रांगोळ्या सजवण्यात आल्या, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, महिलांनी आणि पुरुषांनी बांधलेले आकर्षक फेटे यामुळे गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
सरपंच शशिकला सातपुते यांच्या बिनविरोध निवडीचा हा सोहळा गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
सणसवाडीच्या इतिहासात ‘नवरा-बायको’ सरपंच होण्याचा विक्रम –
या निवडीनिशी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासात अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. काही वर्षांपूर्वी रमेश सातपुते यांनी सरपंचपदाची जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांची पत्नी शशिकला सातपुते सरपंच झाल्याने गावात पहिल्यांदाच नवरा-बायको दोघेही सरपंचपदी विराजमान झाल्याची विशेष नोंद राहणार आहे. ग्रामस्थांनी याचे स्वागत करत सातपुते कुटुंबाच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला.

युवराज दरेकर यांच्या नेतृत्त्वामुळे सर्व शक्य” — पॅनलची भावना –
पॅनलमधील सदस्यांनी रूपाली दरेकर यांनी दिलेला शब्द पाळून योग्य वेळेत राजीनामा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. माजी उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर म्हणाले, “ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यामागे युवराज दरेकर यांचे सक्षम नेतृत्व महत्त्वाचे आहे. त्यांनी घेतलेली नैतिक जबाबदारी आणि दिलेला शब्द पाळल्यामुळेच आज हा बदल सुरळीतरीत्या झाला.”
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, माजी सभापती मोनिका हरगुडे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, सुवर्णा दरेकर, स्नेहल भुजबळ, संगीता हरगुडे, युवराज दरेकर, माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, मनसे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, भाजपचे बाबासाहेब दरेकर, ॲड. विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, मोहन हरगुडे, मोहन तुकाराम हरगुडे, राहुल हरगुडे, तनुजा दरेकर, ललिता दरेकर, तनुजा दरेकर , सुनिता दरेकर, नवनाथ भुजबळ, संभाजी साठे, आशा दरेकर माजी चेअरमन सुहास दरेकर,गोरख दरेकर, कैलास दरेकर, उद्योजक रवींद्र भुजबळ, गजाबाप्पू हरगुडे , माजी ग्राम पंचायत सदस्या ललिता भुजबळ, अनिल दरेकर, प्रसिद्ध उद्योगपती रामदास दरेकर, दगडू दरेकर, गोरख दरेकर, मच्छिंद्र हरगुडे, संदीप भुजबळ, नवनाथ दरेकर, शिवसेना तालुका अध्यक्ष अमोल हरगुडे, अशोक हरगुडे, अध्यक्ष सावता परिषदेचे गोरक्ष भुजबळ मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता
