स्वामींच्या कृपेने साकारला भक्ती-सेवेचा महायज्ञ’: कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून ६५०० भाविकांना दर्शनाचा लाभ

Swarajyatimesnews

आम्ही आलो नाही तर आम्हाला स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून बोलावले 

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) , ७ नोव्हेंबर : भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम घडवून आणणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम येथे संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण समर्पणभावाने आयोजित केलेल्या या मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेत ६५०० पेक्षा अधिक भाविकांनी त्साहात सहभाग घेतला. यात विशेष म्हणजे मोठ्या संख्येने महिला भगिनींचा सक्रिय सहभाग होता.

१३८ बसमध्ये ६५००  भाविकांना त्र्यंबकेश्वर व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दर्शन सोहळ्यामध्ये कासारी, राऊतवाडी, वाबळेवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी सहभाग घेतला. या सोहळ्याचे आयोजन कुसुम मांढरे, शिक्रापूरच्या माजी उपसरपंच सुजाता खैरे, माजी उपसरोंच सागर  सायकर ,ओंकार कर्डिले, केतन खेडकर  प्रकाश गुळवे,  ढेकळे साहेब,  दत्तात्रय वाळवेकर,  गंगाधर पठाडे, नवनाथ भुजबळ, विजय काळकुटे,गणेश सातपुते,राहुल काकडे,गणेश राऊत, चंद्रकांत वाबळे व इतर यांनी यात्रा संपन्न होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तर अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.

 कुसुम मांढरेंच्या माध्यमातून स्वामींनी आम्हाला दर्शनाला बोलावले : अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की,आम्हाला कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून श्रींनी म्हणजे स्वामींनी बोलावले कारण अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ दर्शन हे फक्त स्वामींची इच्छा असल्यावर होते.आपल्या कितीही मनात असू द्या, कितीही पैसे, वाहने सर्व व्यवस्था असू द्या त्याचा उपयोग नाही.येथे सत्ता चालते ती स्वामींची त्यांची इच्छा असल्याशिवाय काही शक्य नाही.त्यांच्याच इच्छेने कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून दर्शन झाल्याची श्रद्धायुक्त व भक्तिपूर्ण मनोगत व्यक्त करत कुसुम आबाराजे मांढरे यांचे आभार मानले.

कुसुम आबाराजे मांढरे यांच्यावर स्वामी कृपा होणार –   यावेळी महिला भाविकांनी स्वामींचा आशीर्वाद कुसुम आबाराजे मांढरे यांना असून त्यांच्यावर स्वामींची कृपा आहे.स्वामी त्यांच्या सोबत असणार आहेत तसेच आम्ही सर्व स्वामी सेवेकरी,भक्त त्यांच्या सोबत राहणार आहोत.त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्वामी कृपा होणार असा आमचा विश्वास आहे.स्वामी त्यांच्या मुलीला कधीही काहीही कमी पडू देत नाही आणि ती मुलगी जर इतरांची सेवा करणारी काळजी घेणारी व कुटुंबवस्तल असेल तर स्वामींची कृपा होणार म्हणजे होणार कुसुम मांढरे यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात स्वामींच्या आशीर्वादाने आम्ही स्वामीभक्त ते प्रत्यक्षात आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यात्रेची विशेष वैशिष्ट्ये :

पवित्र दर्शनाचा लाभ : भाविकांना त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी मिळाल

गुरुपीठ दर्शन : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ येथे समाधी दर्शन

आध्यात्मिक कार्यक्रम: यावेळी आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला.

सर्वसमावेशक सोयी : वाहतूक, भोजन, निवारा, आरोग्य सेवा या सर्वांची उत्तम व्यवस्था

“ही केवळ यात्रा नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये श्रद्धा, एकता आणि सेवाभाव जागवण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे. माझ्या माता-भगिनी आणि ज्येष्ठांना दर्शनाचा दिलेला शब्द पाळणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. समाजसेवेची ही वाटचाल अशीच सुरू राहील.” – कुसुम आबाराजे मांढरे, माजी सदस्या पुणे जिल्हा परिषद 

यात्रेदरम्यान ‘ श्री स्वामी समर्थ’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी संपूर्ण परिसर गंजून गेला होता. भाविकांनी “हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची” , निराकार गुरु रे गुरू निर्गुण, गुरुचरित्राचे कर पारायण यावर मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने टाळ्या वाजवत नामस्मरण केले. देवांच्या विविध अभंगावर टाळ-मृदंगाचा ठेका धरला. वारकऱ्यांच्या भजनाने वातावरण अत्यंत भक्तिमय बनले होते.

महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग : या यात्रेतील सर्वात गौरवास्पद बाब म्हणजे महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणातील सहभाग. त्यांच्या शिस्तबद्ध आचरणाने आणि भक्तिभावाने सर्वांचे मन जिंकले. एक ज्येष्ठ महिला भक्त शांताबाई पाटील म्हणाल्या, “कुसुम मांढरे यांनी  केलेली ही व्यवस्था खरोखर आईसारखी ममतेची , माया लावणारी काळजी घेणारी आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीचा विचार केला होता.”

संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांच्या सर्व सोयी-सुविधांकडे लक्ष देण्यात आले होते.गावातील बस स्थानकापासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने सेवा बजावली. भोजन, पाणी, आरोग्य तपासणी, विश्रांती या सर्व बाबतीत उत्तम व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श : कुसुम आबाराजे मांढरे यांच्या या सेवाभावी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भक्ती आणि सेवेच्या माध्यमातून समाजसेवेचा हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “सेवा हीच साधना, आणि समाजसेवा हेच माझं महाकालाला अर्पण” या विचारातून उभारलेली ही यात्रा खरोखरच भक्तिभाव, जनकल्याण आणि मानवतेचा सोहळा ठरली आहे.या कार्यक्रमात सेवेसाठी उद्योजक आबाराजे मांढरे, विविध हितचिंतक, ग्रामस्थ, पाहुणे, मित्र, आणि मोठ्या संख्येने युवा स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!