किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

Swarajyatimesnews

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद 

पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व पुणे भाजप अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी सिद्धेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या काशी-अयोध्या मोफत दर्शन यात्रेच्या संवाद कार्यक्रमात केले.

प्रदीप विद्याधर कंद यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत स्पष्ट शब्दात म्हटले, “लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य माणसासाठी काम करणाऱ्या हितचिंतक व्यक्तिमत्वाला आपण सर्वांनी एकत्रितपणे ताकद द्यावी. किरण साकोरे सारख्या सक्षम नेत्याची आपल्या परिसराला  गरज आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, अडीअडचणीत उभे राहणारे, प्रत्येकाशी आपुलकीने व प्रेमाने वागणारे किरण साकोरे कधीही कमी पडणार नाहीत. किरण, तू काळजी करू नकोस. तुला काशी विश्वनाथाचा आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद लाभो. सर्वजण तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत भक्कम साथ देतील.” असा विश्वास व्यक्त केला.

निवडणूक आली की अनेकजण जागे होतात…अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात : अनेकवेळा माणसे निवडणुकीच्या वेळी जागे होतात पळायला सुरूवात करतात अनेक गोष्टी करायचा प्रयत्न करतात.पण सतत अखंडपणे गेली पंधरा वीस वर्ष आम्ही या परिसराचे नेतृत्व करत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला.

आपुलकीच्या नात्याने राम कृष्ण हरी म्हणाले, माऊली वाळके  उपसभापती झाले : माऊली वाळके दोन वेळा पंचायत समितीला निवडून आले. आपुलकीचे नाते जपले त्यांची पुण्याई एव्हढी होती की फक्त राम कृष्ण हरी म्हणाल्याने जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले.विकासाचे काम असेल तर प्रदीप दादा  करतील पण जनतेशी प्रेमाचे नाते टिकवायचे असा सल्ला दिल्याचे सांगत माऊली वाळके हे उपसभापती प्रेम, आपुलकी व राम कृष्ण हरी म्हणाल्याने झाल्याचे सांगितले.

किरण तू काळजी करू नको – किरण तू काळजी करू नको, तुला काशी विश्वनाथाचा, प्रभू श्री रामाचा आशीर्वाद मिळणार असून महिला भगिनी व बंधू  पहिला आशीर्वाद कुटुंबासाठी व दुसरा आशीर्वाद सर्वजण किरण सकोरेंचे सगळे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मागतील असा विश्वास व्यक्त केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भागाचा नावलौकिक पुणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा होईल यासाठी आपण सगळेजण विचार करू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी एकमेकांच्या हातात हात घेत वज्रमूठ करत किरण साकोरे यांना भक्कम पाठिंबा दाखवला यामुळे आमची एकी आणखी बरेच काम बाकी असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी फुलगावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते सुनील वागस्कर, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र कंद, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके यांनी किरण साकोरे यांच्या नेतृत्व, कार्य व दर्शन यात्रा याविषयी मत व्यक्त केले.

दुसऱ्या टप्प्यातील काशी अयोध्या यात्रा १३ नोव्हेंबर रोजी – प्रदिपदादा कंद युवा मंच व किरण साकोरे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काशी विश्वेश्वर – अयोध्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे १३ नोव्हेंबर रोजी जाणार असल्याचे सांगण्यात आले. यात्रेतील भाविक-भक्तांना आवश्यक माहिती देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा भव्य संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांसाठी स्नेहभोजनाची तसेच गावागावांतून ने-आण करण्यासाठी बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रदीप कंदांचे हात बळकट करण्यासाठी किरण साकोरांना साथ देवू –“आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रदिप विद्याधर कंद यांनी आजवर कधीही कमी पडू दिले नाही. सर्वांच्या अडीअडचणीत, सुख-दुःखात ते नेहमी धाडसाने उभे राहिले आहेत. यापुढे त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेने किरण साकोरे यांना भक्कम साथ द्यावी.” असे हवेली पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली वाळके यांनी आवाहन केले.

उत्तम व्यवस्था,मोठी स्क्रीन –  कार्यक्रमस्थळी भाविक-भक्तांच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था केली होती. काशी विश्वनाथ व अयोध्या येथे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या दर्शनासाठी गेलेल्या पहिल्या यात्रेचे फोटो मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपित करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारावून गेले होते. किरण संपत साकोरे यांनी उपस्थित जनसमुदायाला वाकून जमिनीवर नतमस्तक होऊन नमस्कार केल्याने सर्व महिला भगिनी व भाविकभक्तांशी भावनिक एकरूपता निर्माण झाली.

या कार्यक्रमात फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे यांनी मनोगत व्यक्त करत किरण साकोरेंच्या आयोजन, नियोजन, व सेवेसाठी कौतुक केले. भाजपचे युवा नेते अमोल शिवले, फुलगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच मंदाकिनी साकोरे, लोणीकंदच्या माजी सरपंच लक्ष्मी नारायण कंद, माजी सरपंच रोहिणी वाळके, भाजप उद्योग आघाडीचे संतोष झुरुंगे, लोणीकंदचे माजी प्रभारी सरपंच बापूसाहेब शिंदे, दिपक वाळके, माजी उपसरपंच ओंकार कंद, सोहम शिंदे यांसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

यात्रेची सविस्तर माहिती गौरव झुरुंगे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अतुल बनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच राहुल वागस्कर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे  वातावरण होते आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व नेत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!