सुखाने जगायचे असेल तर जीवनमूल्ये उच्च दर्जाची असावीत: इंद्रजित देशमुख

Swarajyatimesnews

प्रतिनिधी: राजाराम गायकवाड

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे, उपसरपंच वंदना भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र मांढरे, सुभाष खैरे, प्रकाश वाबळे, त्रिनयन‌ कळमकर, मयूर करंजे, पंढरीनाथ गायकवाड, कृष्णा सासवडे, विशाल खरपुडे, राजेंद्र विधाटे, अनिल मांढरे, सारिका सासवडे, पूजा भुजबळ, उषा राऊत, कविता टेमगिरे, मोहिनी मांढरे, शालन राऊत, सीमा लांडे, ज्येष्ठ पत्रकार राजाराम गायकवाड यांच्यासह अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

इंद्रजित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येकाने आपल्या भविष्याची दिशा स्वतःच ठरवायला हवी. त्यांनी केवळ भौतिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी घरात पुस्तकांची संख्या आणि त्यांचे वाचन यावर घराचे मोठेपण अवलंबून असते, असे सांगितले. तसेच, आयुष्यातील नकार पचवण्याची क्षमता विकसित करण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे यांनी देशमुख यांच्या विचारांचे कौतुक केले आणि शिक्रापूर गावाला ‘विद्येची पंढरी’ म्हणून गौरविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र विधाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!