कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमाचे (ता. शिरूर) सरपंच संदीप ढेरंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी विशेष निमंत्रण मिळाल्याने कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. सरपंच ढेरंगे यांच्या विकासकामांची दखल थेट दिल्लीत घेतली गेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी काढले.
या निमंत्रणाबद्दल बोलताना प्रशांत ढोले म्हणाले, “संदीप ढेरंगे हे गावासाठी निस्वार्थपणे काम करणारे सरपंच आहेत. गावाच्या विकासासाठी एवढा वेळ देणारा सरपंच मी पहिल्यांदाच पाहिला आहे. प्रत्येक कामासाठी त्यांचा असलेला पाठपुरावा, तळमळ आणि काम पूर्ण करण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.” एखादे काम पूर्ण होईपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत राहतात आणि ते तातडीने पूर्ण करून घेतात, असे कौशल्याचे नेतृत्व तरुणांमध्ये असल्याचा अभिमान वाटतो, असेही ढोले यांनी नमूद केले.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपरतन गायकवाड, एपीआय देशमुख, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गव्हाणे, भाजपचे संपत गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पोपट गव्हाणे, राजेंद्र गवदे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, भगवान परदेशी, प्रदीप नानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.