घर गहाण ठेवायला लावले.. हप्तेही भरून घेतले आणि कर्ज नाकारल्याने फायनान्स कंपनीच्या त्रासाने अखेर त्याने आयुष्यच संपवले..!
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून फायनान्स कंपनीने कर्जासाठी घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे व नियमानुसार सुरवातीचे काही हप्ते भरून घेतले. परंतु, कर्ज न देता त्रास दिल्याने हरिभाऊ गायकवाड (वय ५३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.(A shocking incident has come to light in Talegaon Dhamdhere (Tal. Shirur). The finance company, despite mortgaging a house for a loan, did not give the loan and even after insisting on the loan installments, he paid some of the initial installments as per the rules. However, after being harassed without giving the loan, Haribhau Gaikwad (aged 53) committed suicide by hanging himself. A case has been registered at Shikrapur police station against Suraj Dilip Pawar and Mahendra Patil of Mahindra Finance Company for abetting suicide.)
शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव-ढमढेरे येथील हरिभाऊ गायकवाड यांनी व्यवसायासाठी २०१८ मध्ये शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीच्या शाखेकडे पाच लाख रुपयांची कर्ज मागणी केली. शिक्रापूर शाखेतील सूरज दिलीप पवार व महेंद्र पाटील यांनी गायकवाड यांचेशी चर्चा करून ‘फायनान्स करू, त्यासाठी गहाण म्हणून घर, शेती जे काही असेल ते द्यावे लागेल.’ असे सांगितले होते. यानंतर गायकवाड यांनी राहत्या घराची सर्व कागदपत्रे देत महिंद्रा फायनान्सच्या नावाने घराचे गहाणखत केले.
पुढील काळात महिंद्रा फायनान्स कंपनीने काही हप्ते भरण्यास सांगितल्यावरून त्यांनी काही हप्तेही भरले. मात्र, त्यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या रकमेचा धनादेश देण्यास कंपनी टाळू लागली. या प्रकारामुळे गायकवाड हतबल झाले होते. गायकवाड यांनी महिंद्रा फायनान्सचे पुणे येथील कार्यालय गाठले. पुणे कार्यालयात त्यांना ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कर्जाचा धनादेश आम्ही देणार नाही,’ असे सांगितले.
कर्जही मिळत नाही आणि केलेले गहाणखतही कंपनी बदलत नाही, त्यामुळे निराश झालेल्या गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद शितल गायकवाड यांनी दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.